जिल्ह्यात अभाअनिसचे काम जोमाने करणार अँड. राजीव बिले

कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेड्यापाड्यांमध्ये अजूनही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहेत . महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा २०१३ केला संमत केला . मात्र शासनाकडून या कायद्याचा गावागावांमध्ये प्रचार आणि प्रसार हवा तसा केला गेला नाही . त्यामुळे गावागावांमध्ये जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती व भोंदू लोकांचे प्रस्थ वाढत आहे . यासाठी या कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये मा . जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीही स्थापन झाली आहे . या समितीद्वारे आता हा कायदा जनतेपर्यत पोहोचविला जाईल . मात्र आमची समिती आणि पीआयएमसीच्या वतीने हा कायदा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जादूटोणा करणाऱ्या व्यक्ती व भोंदू लोकांपासून लोकांची फसवणूक थांबवण्यासाठी जिल्ह्यामध्ये जोमाने काम करणार असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गचें अध्यक्ष अँड राजीव बिले यांनी . अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्गची कार्यकारिणीची सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ येथे पार पडली. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .यावेळी त्यांच्या समवेत जिल्हासंघटक विजय चौकेकर, जिल्हासरचिटणीस अजित कानशिडे, उपाध्यक्ष डॉ. संजिव लिंगवत व महेंद्रकुमार धामापूरकर, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, सहकार्याध्यक्ष महेंद्र कदम, जिल्हा संघटिका रूपाली पाटील ,सहखजिनदार श्रीवदन आरोसकर, मार्गदर्शक डॉ. सतिष पवार ,सावंतवाडी संपर्कप्रमुख फिलिक्स फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की प्रा. श्याम मानव सरांनी आमचा देवधर्माला विरोध नाही मात्र देव धर्माच्या नावावर सर्वसामान्य जनतेचे शोषण करणाऱ्या व लुबाडणाऱ्या विरुद्धचा लढा आहे ही भूमिका घेऊन समितीची स्थापना केली . या भूमिकेच्या विरुद्ध जिल्ह्यामध्ये आमचा कोणताही पदाधिकारी व सदस्य काम करणार नाही. मात्र देव आणि भक्त यांच्यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तरच खऱ्या अर्थाने देव आणि भक्ताचे नाते अधिक जवळ येईल. यासाठी समाजातल्या अंधश्रद्धा प्रबोधनाद्वारे दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन माणसा माणसांमध्ये रुजविणे आणि माणुसकी पूर्ण स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानणारा व स्वीकारणारा आनंदी समाज निर्माण करणे हे आमचे प्राधान्याने ध्येय राहील. यावेळी विजय चौकेकर यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका व जादूटोणाविरुद्ध कायद्याची माहिती उपस्थितांना करून दिली . जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जादूटोणा विरोधी कायद्याचे व्याख्यान घेण्याचे नियोजन करण्यात आले . तसेच कणकवली मध्ये घेण्यात आलेल्या जादूटोणा विरोधी कायदाच्या प्रात्यक्षिकासह कार्यशाळेत सहभागी झालेल्यांची पुन्हा एकदा कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले .यावेळी सदस्या अनुश्री चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, वर्षा कुडाळकर, नामदेव मठकर, अजिंक्य बिले आदी सदस्य व हितचिंतक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांमधून कार्यकारणीच्या रिक्त पदांवर नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली .या सभेचे प्रास्ताविक विजय चौकेकर यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हासचिव अजित कानशिडे यांनी केले .





