वेंगुर्ले तालुक्यात 2023 च्या ग्रा. प. निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

शिवसेनेच्या दोन ग्रामपंचायत भाजपा ने ताब्यात घेतल्या

वेंगुर्ले तालुक्यात 5 नोव्हबर रोजी 4 ग्रामपंचायत साठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा आज सोमवारी 6 रोजी निकाल घोषित करण्यात आला. यात पेंडूर , खानोली व मातोंड या 3 ग्रामपंचायत थेट सरपंच निवडीत भाजपने विजय मिळविला. तर वायंगणी ग्रामपंचायत वर थेट सरपंचपदी उद्धव ठाकरे शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला.

पेंडूर ग्रामपंचायत थेट सरपंच पदी भाजपचे संतोष दशरथ गावडे हे विजयी झाले.तर गाव विकास पॅनलचे (शिंदे गटाचे) गुंडू महादेव कांबळी हे पराभूत झाले. मातोंड ग्रामपंचायत थेट सरपंच पदी भाजपच्या मयुरी महेश वडाचेपाटकर विजयी झाल्या.तर उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पल्लवी रमाकांत आरमारकर पराभूत झाल्या.खानोली ग्रामपंचायत थेट सरपंच पदी भाजपचे
सुभाष हरी खानोलकर हे विजयी झाले.अन्य 5 उमेदवार पराभूत झाले. वायगणी ग्रामपंचायत थेट सरपंच पदी उद्धव ठाकरे शिवसेनेचे दत्ताराम अरुण दुतोंडकर हे विजयी झाले. तर भाजपचे
श्यामसुंदर शांताराम मुननकर व माजी सरपंच
सुमन हरिश्चंद्र कामत हे पराभूत झाले. तर या 4 ग्रामपंचायत मध्ये सदस्य निवडणुकीत भाजपनेच वर्चस्व राखले आहे.एकुण सदस्या पैकी २२ ग्रामपंचायत सदस्य भाजपाचे विजयी झाले . विजयी उमेदवारांचे पदाधिकारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. माजी आमदार राजन तेली व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निवडणूक निकालानंतर वेंगुर्लेत भेट देऊन भाजपा विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल – मनवेल फर्नांडीस – प्रीतेश राऊळ- दादा केळुसकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , सुजाता देसाई , ज्ञानेश्वर केळजी , सोशल मीडियाचे श्रीकृष्ण उर्फ राजु परब , कमलेश गावडे , प्रकाश रेगे , सत्यविजय गावडे , बाळा सावंत इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

वेंगुर्ले प्रतिनिधि

error: Content is protected !!