राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेसाठी वराडकर हायस्कूल कट्टाच्या चार विद्यार्थ्यांची निवड

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कला उत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत वराडकर हायस्कूल कट्टाच्या सर्वाधिक चार विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेले आहे. या स्पर्धेत पारंपारिक नृत्य प्रकारात अवधूत वैभव आचरेकर, खेळणी बनविणे या प्रकारात सानिया अनिल कुडतरकर, त्रिमित शिल्प या कला प्रकारात मिथिल महेश आंगचेकर व श्रेया समीर चांदरकर यांची निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले..
दिनांक २१ते २४नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत हे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर,विश्वस्त श्री आनंद वराडकर,श्री शेखर पेणकर, सचिव श्री सुनील नाईक व श्रीमती विजयश्री देसाई,शालेय समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ तसेच वराडकर हायस्कूल कट्टाचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





