‘आयडीयल इंग्लिश स्कूलच्या पालकांनी केला प्रशालेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गाचा सत्कार’

कणकवली/मयुर ठाकूर.
प्रशाला ही समाजाची प्रतिकृती मानली जाते.कारण भावी सुजाण नागरिक घडवण्याचे महान कार्य प्रशाला करते.संस्कारक्षम विदयार्थी घडविण्यासाठी शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो.सोबतच विद्यार्थ्यांसाठी नेहमीच शाळेत तत्पर असणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात.आयडियल प्रशाला हे जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षण संकुल आहॆ.या प्रशालेत शिक्षकांसोबत इथले चतुर्थी श्रेणी कर्मचारी सुद्धा इथल्या विदयार्थ्यांची मायेने काळजी घेत असतात.
शाळेच्या वेळात तसेच शाळा सुटल्यानंतर पालक वर्ग येईपर्यंत विद्यार्थ्यांचा जबाबदारीने सांभाळ करतात. आणि म्हणूनच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयडियल इंग्लिश स्कूलच्या तरळे-वैभववाडी येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी नुकताच प्रशालेतील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू व मिठाई देऊन सत्कार केला.ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल आणि आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना देसाई यांच्या मुख्य उपस्थितीत तसेच तरळे वैभववाडी येथील पालक मंगेश मोहिते ,गणेश रावराणे ,प्रशांत हटकर, भाग्यश्री हटकर ,प्रदीप मिश्रा ,राजेंद्र ढगे व गौरी पाताडे यांच्या पुढाकारातून आजचा वेगळा सत्कार सोहळा पार पडला.या सत्कार प्रसंगी चंद्रशेखर साद्ये ,श्रीकांत घाडी ,हर्षदा सावंत, जितेंद्र हिंदळेकर ,आदेश चिंदरकर आणि जी.जी चव्हाण यांना सन्मानित करण्यात आलं.
आजच्या यां वेगळ्या उपक्रमाबद्दल पालक वर्गाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.