बेळणेच्या सरपंच निवडणुकीत युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर ठरले “किंगमेकर”

बेळणे खुर्द सरपंच पदाच्या निवडणुकीत अविनाश गिरकर यांच्या विजयात उचलला मोठा वाटा

कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द ग्रामपंचायत च्या निवडणुकीत सरपंच पदावर शिवसेना ठाकरे गटाचे अविनाश गिरकर हे मोठ्या बहुमताने विजयी झाल्यानंतर या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत विजय खेचून आणणारे किंगमेकर म्हणून युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन आचरेकर आगे बढोच्या घोषणाही देण्यात आल्या. बेळणे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे विलास करांडे यांना 26, भाजपचे लक्ष्मण चाळके यांना 192 तर शिवसेना ठाकरे गटाची अविनाश गीरकर यांना 218 मते पडली. या संपूर्ण प्रक्रियेत युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते श्री. आचरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!