लाड पागे समिती अहवालानुसार सफाई कर्मचारी नेमणुक कायम ठेवा – गोविंद वाडकर

मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली निवेदनद्वारे मागणी
लाड आणि पागे समितीनुसार नगर परिषदेच्या सफाई कर्मचारी नेमणुकीवरील वशिला पद्धत कायम ठेवण्यात यावी व समितीच्या अहवालानुसार सेवा सवलत पूर्ववत लागू करावी अशी मागणी सावंतवाडी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गोविंद बाळा वाडकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी आज नामदार केसरकर हे सावंतवाडीच्या दौऱ्यावर आले असता त्यांना सादर केले यावेळी अमरदीप कांबळे मोहन कांबळे मयूर कांबळे किरण कांबळे प्रवीण कांबळे किशोर जाधव मीनाक्षी पवार सतीश सांगेलकर नारायण आंबेडकर विजय कोटेकर शेखर महत्तर कमलेश आरोलकर आदी 30 जण उपस्थित होते.
सावंतवाडी, प्रतिनिधि