अभाअनिस समितीची रविवारी सभा

अँड राजीव बिले यांच्या कार्यालयात छोटेखानी मिटिंग् घेण्यात आली . या मिटिंग् मध्ये अध्यक्ष अँड राजीव बिले , जिल्हा संघटक विजय चौकेकर , जिल्हा सचिव अजित कानशिडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते . या सभेतअखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गची कार्यकारीणीची सभा अँड. राजीव बिले यांचे अध्यक्षते खाली रविवार दि . ०५ ।११I २०२३ रोजी दुपारी ठिक ३ . o o वा . संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. या सभेमध्ये मागील सभा इतिवृत्त वाचून मंजूर करणे, जमा खर्चास मंजूरी देणे, कणकवली येथे घेतलेल्या जादूटोणा विरोधी कायदयाच्या प्रात्यक्षिकासह कार्यशाळेच्या जमाखर्च अहवालास मंजूरी देणे, समितीचे नवीन खाते उघडणे, सभेमध्ये जिल्हा कार्यकारीणीचा विस्तार करणे आणि जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जादूटोणा विरोधी कायदाची प्रात्यक्षिकासह कार्यशाळा आयोजित करण्यासंबंधी नियोजन करणे, जिल्ह्यातील शाळा ,विद्यालये, महाविद्यालये , कॉलेज, गावा गावात जादूटोणा विरोधी कायद्याचे व्याख्यान आयोजित करणे, आदी विषयांवर चर्चा करून ठराव घेतले जाणार आहेत .
तरी अभाअंनिस मध्ये काम करू इच्छिणार्या सुजाण नागरिकांनी , सभासदांनी हितचिंतकानी सभेस उपस्थित रहावे असे जिल्हा संघटक विजय चौकेकर आणि जिल्हा सचिव अजित कानशिडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे .

error: Content is protected !!