ब्रँडेड कंपनीच्या नावाचा गैरवापर करत पत्रे विक्री प्रकरणी “तो” व्यवसायिक अडचणीत

कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

कणकवली तालुक्यातील प्रकार

कणकवली शहरा लगत असलेल्या एका दुकानामध्ये एका ब्रँडेड कंपनीच्या लोगो चा अनधिकृत वापर करून बनावट लोगोने पत्र्यांची विक्री करत असल्या प्रकरणी संबंधित कंपनीकडून त्या दुकानदारा च्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कंपनीने पोलिसात धाव घेतली आहे. याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलीस स्टेशनमध्ये सुरू असून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कंपनीच्या नाव व लोगो चा गैरवापर केल्याप्रकरणी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी या प्रकरणी कंपनीला आपल्या नाव किंवा लोगो चा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास तक्रार देण्याचा अधिकार असल्याने त्यांनी सांगितले. दरम्यान या घटनेनंतर त्या दुकानात पाहणी केली असता असे पत्रे आढळले नसल्याचेही त्यांनी सांगितले

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!