मुंबई विद्यापीठ मैदानी स्पर्धेत कणकवली महाविद्यालयाची बाजी.

कणकवली/मयूर ठाकूर.
मुंबई विद्यापीठ कोकण झोन-०४ च्या मैदानी स्पर्धा नुकत्याच डेरवण, ता. चिपळूण येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत कणकवली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कु. निकिता लाड (प्रथम वर्ष) वाणिज्य हिने ३०० मीटर 'स्टीफल चेस' या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. ११० मीटर हर्डल स्पर्धेत दीप नांदगावकर (व्दितीय वर्ष वाणिज्य) यांने तृतीय क्रमांक मिळविला. तर १०० मीटर हर्डल स्पर्धेत सुजाता हर्णे(प्रथम वर्ष वाणिज्य) हीने तृतीय क्रमांक मिळवला. कु.निकिता लाड हिची मुंबई विद्यापीठ पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजु व संस्था पदाधिकारी तसेच प्राचार्य युवराज महालिंगे यांनी अभिनंदन केले आहे.