जानो गीता बनो विजेता – डॉ.मालपाणी

बी आय डी एफ तर्फे घोडावत विद्यापीठात व्याख्यान संपन्न
जयसिंगपूर: संजय घोडावत विद्यापीठात बी आय डी एफ (बिझनेस अँड इंडस्ट्री डेव्हलपमेंट फोरम)यांच्या वतीने उद्योगपती डॉ. संजय मालपाणी यांचे ‘जानो गीता बनो विजेता’ या विषयावर बुधवारी प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी ते म्हणाले, की भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गीते द्वारे अर्जुनाला विजेता बनण्याचा मार्ग दाखवला.तोच मार्ग गीता समजून घेतल्यास आपल्यालाही सापडू शकतो.उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर गीतेत दिलेल्या उपदेशाप्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे.असे केल्यास आपण कोणत्याही क्षेत्रात विजेता बनू शकतो याची ग्वाही त्यांनी दिली.गीतेतील विविध श्लोक आणि त्याचा अर्थ त्यांनी समजून सांगितला.
बी आय डी एफ चे अध्यक्ष संजय घोडावत व उपाध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांनी डॉ.संजय मालपाणी यांचे स्वागत केले. संजय घोडावत यावेळी म्हणाले,की समाजाच्या फायद्यासाठी अशा प्रकारचे व्याख्यान फोरम तर्फे सातत्याने आयोजित करण्यात येतात. यामुळे उद्योग व्यवसायातील दररोजचे ताण-तणाव काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळते. तसेच त्यांनी बीआय डी एफ मुळे या भागातील उद्योग व्यवसायिकांना कसा फायदा होतोय याबद्दलची माहिती दिली.अण्णासाहेब चकोते म्हणाले, की आपल्या जगण्याचा उद्देश साध्य करायचा असेल तर चांगले विचार अंगीकारणे गरजेचे आहे.
यावेळी ग्लोबल बिझनेस फोरम पुणे चे अरविंदजी जैन,राजेशजी जैन, प्रकाशजी पारेख,श्रवणजी अग्रवाल, दिनेशजी जैन,इतर सदस्य तसेच घोडावत कुटुंबांतील नीता घोडावत,श्रेणीक घोडावत, राकेश घोडावत,राजेश घोडावत, पंचक्रोशीतील उद्योग- व्यवसायिक, ज्येष्ठ नागरिक,फोरमचे सेक्रेटरी विनायक भोसले,सर्व सदस्य आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते.कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना उद्योजक प्रकाशजी पारेख यांनी संजय घोडावत यांच्या कार्याचे व मालपाणी यांच्या व्याख्यानाचे कौतुक केले.फोरमचे खजिनदार महेश सारडा यांनी सर्वांचे आभार मानले तर सूत्रसंचालन सोहम तिवडे यांनी केले.