मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशा नंतर सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगाला मिळाले कायमस्वरूपी अध्यक्ष व सदस्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी वेधले होते लक्ष

सिंधुदुर्ग ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी इंदुमती मलूष्टे तर सदस्य म्हणून योगेश खाडीलकर व श्रीमती अर्पिता फणसळकर यांची निवड

   सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगामध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष व सदस्य नसल्यामुळे या न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले होते. गेली तीन-चार वर्ष या रत्नागिरी येथील अध्यक्ष व सदस्य काही काळासाठी या जिल्ह्यातील कामकाज चालवण्यासाठी येत होते. अशातच गेल्या सहा महिन्यापूर्वी रत्नागिरीतील याही अध्यक्ष व सदस्यांची मुदत संपल्यामुळे तेही येत नव्हते.त्याचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खटल्यांवर होत होता. ग्राहक संरक्षण  कामकाजच यामुळे ठप्प झाले होते. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील ग्राहक तक्रारी प्रलंबित राहिल्यामुळे ग्राहकांवर मोठा अन्याय होत होता.तसेच त्यांना आर्थिक भूदंड सोसावा लागत होता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे लक्ष वेधले होते.  या रिक्त पदामुळे ग्राहकांना या व्यतिरिक्त कमी खर्चात व कमी वेळेत न्याय मिळवून देणारी दुसरी यंत्रणाच नाही. अशावेळी ही पद बरीच काळ रिक्त राहिली तर या आयोगावरील विश्वासच ग्राहकांचा उडून जाईल अशा प्रकारची भावना महाराष्ट्र राज्याचे नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री माननीय छगन भुजबळ यांना भेटून त्यांचे लक्ष वेधत याबाबत निवेदन दिले होते. खरं म्हणजे ही बाब ऍड. हितेश कुडाळकर यांनी काका कुडाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती . त्यानुसार मी महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या निदर्शनास निवेदनाद्वारे आणून दिले. प्रदेश कार्यालया जनता दरबाराच्या वेळी त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतलं आणि त्याचवेळी लवकरात लवकर अध्यक्ष व सदस्य देण्याच आश्वासन दिलं होतं.  त्यानुसार चार दिवसापूर्वीच सिंधुदुर्ग ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी श्रीमती इंदुमती मलूष्टे तर सदस्य म्हणून श्री योगेश खाडीलकर व श्रीमती अर्पिता फणसळकर यांची नियुक्ती शासनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षणाअंतर्गत रखडलेल्या ग्राहकांच्या तक्रारींना आता लवकरच न्याय मिळेल आणि या जिल्ह्याच्या मागणी प्रमाणे जलद अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती केल्याबद्दल  त्यांचे आभार मानले आहेत. 

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!