कुडासे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

सरपंचपदी श्रद्धा नाईक; ६ सदस्य बिनविरोध, १ रिक्त

प्रतिनिधी l दोडामार्ग दोडामार्ग तालुक्यातील कुडासे खुर्द, बोडण , साटेली- भेडशी या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या;त्यातील कुडासे खुर्द ग्रामपंचायत निवडणूक ग्रामस्थांनी बिनविरोध केली. सरपंचांसह सात सदस्यांनी सात जागांसाठी ( ओबीसीसाठीची एक जागा रिक्त )अर्ज भरले.अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकास एक अर्ज राहिल्याने सातही सदस्य बिनविरोध झाले.त्यात थेट सरपंच पदासाठी अर्ज भरलेल्या श्रद्धा नाईक यांचाही समावेश आहे.आता फक्त ग्रामपंचायत आणि सरपंच बिनविरोध झाल्याच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
कुडासे खुर्द ग्रामपंचायतीची ही तिसरी निवडणूक आहे. दोन टर्म सरपंचपदाचा कारभार संगीता सुहास देसाई यांनी पाहिला.त्यांनी चांगले काम केले
तिलारी प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील पाल प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुडासे येथे झाले आहे.त्यांची ग्रामपंचायत कुडासे खुर्द या नावाने घोषित झाली होती.त्या ग्रामपंचायतीची तिसरी निवडणूक यावेळी बिनविरोध झाली.
प्रभाग क्रमांक एक मधून सर्वसाधारण पुरुष गटातून गणपत रामदास देसाई, स्त्री प्रवर्गातून सानवी दळवी, प्रभाग क्रमांक दोनमधून सर्व साधारण गटातून राजन गवस, स्त्री प्रवर्गातून अमिता राणे, प्रभाग क्रमांक 3 मधून सर्व साधारण स्त्री प्रवर्गातून संजना सावंत, विवेक भिवा पालव तर थेट संरपच म्हणून श्रद्धा भरत नाईक यांची निवड गावकऱ्यांनी केली. प्रभाग क्रमांक ३ मधील ओबीसी स्त्री आरक्षण होते;पण एकही अर्ज न आल्याने जागा रिक्त राहिली आहे.
मागील निवडणूकीत संगीता देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्य निवडून आणले होते, तर दोन सदस्य बिनविरोध निवडून आले होते.यावेळी महिलांसाठी सरपंचपद असतानाही संगिता देसाई यांनी अन्य महिलांना संधी मिळावी यासाठी श्रद्धा नाईक यांना संधी दिली आणि गावकऱ्यांनी त्यांना बिनविरोध निवडून दिले. गावाने इतिहास रचला ;सर्वाचे आभार

          गावातील अन्य महिलेलाही  सरपंचपद आणि पदाचा अनुभव मिळावा यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला.ग्रामस्थांनी मला दोन वेळा संधी दिली. स्मार्ट ग्रामपंचायत तालुक्यात दुसऱ्यांदा होण्याचा मान गावामुळे  मिळाला.गाव विकासात राजकारण नसावे म्हणून मी सर्वांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते.त्याला गावकऱ्यांनी साथ दिली आणि इतिहास रचला गेला,त्याबद्दल सर्वाचे ऋण व्यक्त करते असे मावळत्या सरपंच संगीता देसाई म्हणाल्या.
error: Content is protected !!