वागदे ग्रामपंचायत मध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत शिबिर

ग्रामस्थांना मोफत हेल्थ कार्ड चे वितरण

सरपंच संदीप सावंत यांच्या उपक्रमाचे ग्रामस्थांतून कौतुक

वागदे ग्रामपंचायतच्या वतीने वागदे आरोग्य उपकेंद्र येथे मोफत आयुष्यमान योजना व आभा हेल्थ कार्ड शिबिरा चा शुभारंभ वागदे सरपंच संदीप रमाकांत सावंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ पूजा काळगे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी श्री डॉ. मुकुल पंचवाडकर, अश्विनी तावडे. श्री खडपकर. श्रीम. धुमाळे. श्रीम परब. श्री पाटील. श्रीम कदम. ग्रामपंचायत सदस्य. नीलम पालव, सुनील गोसावी, सुप्रिया काणेकर, दीपक कदम, भाई काणेकर, आदी उपस्थित होते. सदर योजनेचा लाभ 5 लाख व आरोग्य विमा कवच मिळणार असून वागदे मधील ग्रामस्थ यांनी सरपंच यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!