समाजाला अंधश्रद्धा घातकच-मनोज पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक.

कणकवली/मयुर ठाकूर

आपल्या समाजामध्ये श्रद्धेच्या नावाखाली जपली जाणारी अंधश्रद्धा ही समाजाचे शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान करते काहीवेळ ती श्रद्धा अतिशय घातक ही ठरते असे प्रतिपादन माननीय श्री मनोज पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कणकवली यांनी केले .महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व सहाय्य विभाग अंतर्गत जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग -PIMC व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आयोजित द जादूटोणाविरोधी कायद्याचे मार्गदर्शनासाठी एक दिवशी य प्रत्यक्षिका सतकार्यशाळेच्या विचार मंचावरून ते बोलत होते .यावेळी त्यांच्या समवेत विचार मंचावर राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर जिल्हा संपर्कप्रमुख सचिन हिंदळेकर जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष संजीव लिंगवत साह स प्रतिष्ठान अध्यक्षा रूपाली पाटील कराटे प्रशिक्षक वसंत जाधव कोकण नाऊसंपादक विजय शेट्टी पुढारी उपसंपादक गोवा दीपक जाधव एडवोकेट राजीव बिले कणकवली प्राचार्य युवराज महालिंगे विद्या मंदिर प्राचार्य पी.जे कांबळी कार्याध्यक्ष अनिल चव्हाण मनोविकार तज्ञ रुपेश पाटकर ओरोस मुख्यालय पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाणआदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन मा मनोज पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वल करून करण्यात आले .आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की समाजाचे बुवा बाबा बाया मांत्रिक देवी भगत यांच्यापासून सर्व सामान्य जनतेचे शोषण होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा 2013 ला संमत केला या कायद्यान्वये कमीत कमी सहा महिने व पाच हजार रुपये दंड व जास्तीत जास्त सात वर्ष 50 हजार रुपये दंड म्हणून शिक्षा होऊ शकते केंद्र शासनाचा मॅजिक अॅन्ड रेमेडीज ऍक्ट 1954 या कायद्यांतर्गत आणि जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कृती करणाऱ्यांना शिक्षा केली जाते यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे या कायद्यांतर्गत पीडित त्याचे नातेवाईक अथवा दक्ष नागरिक यांनी दक्षता अधिकारी यांच्याकडे तक्रार दिल्यास त्याची योग्य दखल घेतली जाते जिल्ह्यामध्ये अशा घटना भविष्यात होणार नाहीत यासाठी आपणा सर्वांनी दक्षता घेऊया यासाठी आमचे सहकार्य आपणास पूर्णतः दिले जाईल असे आश्वासन त्याने दिले यावेळी पोलीस निरीक्षक तथा दक्षता अधिकारी अमित याधव व उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर सावंत यां नी या कार्यशाळेला दिलेले संदेश त्यांनी वाचून दाखवले या कार्यशाळेमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यात अंतर्गत येणाऱ्या बारा अनुसूचित व त्या अनुसूची मध्ये बुवा बाबा बाया भगत देवी मांत्रिक कोणते चमत्कार करू शकतात कोणकोणत्या अंधश्रद्धा या अंतर्गत येतात अशा कोणत्या घटना घडल्या त्याची संपूर्ण माहिती विजय चौकेकर यांनी दिली बुवाबाजी आणि अंधश्रद्धा याची माहिती सचिन ह हिंदळेकर योनी प्रात्यशिका द्वारे जिल्हा संपर्कप्रमुख यांनी दिली वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संतांनी खरेच चमत्कार केले होते का याबाबत ची संपूर्ण माहिती रवींद्र खानविलकर राष्ट्रिय अध्यक्ष यांनी दिली देवदासी आणि अंध श्रद्धा याविषयी पी . जेकांबळी .मुख्याध्यापक विद्यामंदिर कणकवली यांनी दिली .देवी वभूत अंगात येणे त्याची कारणेमानसिक आजार याची माहिती अनिल चव्हाण यांनी दिली स्त्रियांचे आजार आणि अंधश्रद्धा याविषयी सखोल माहिती डॉक्टर रुपेश पाटकर यांनी देऊन प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांची उत्तरे दिली या कार्यशाळेत समाजातील विविध क्षेत्रापासून जनतेचे कसे नुकसान होते याची संपूर्ण माहिती या कार्यशाळेत देण्यात आली उपस्थित प्रशिक्षणां र्थींकडून शेवटच्या सत्रात प्रात्त्यक्षिके करून घेण्यात आली .या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी कार्यरत कर्मचारी विद्यार्थी अशा एकूण 90 जणांनी लाभ घेतला कार्यशाळेचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना संतोष कदम यांच्या सौजन्याने प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या कार्यशाळाचे संपूर्ण नियोजन व आयोजन जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर व अभाअनिस चे कार्यकर्ते आनंद धामापूरकर अनिल कदम महेंद्र कदम संतोष कदम विजय लिंगायत प्रभाकर चव्हाण अनुश्री चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण अनिल चव्हाण संभाजी कोरे दिलीप कदम अनिसकुमार चव्हाण आदी नी केले .

error: Content is protected !!