खारेपाटण सखी महिला मंडळ फुगडी संघाने जिंकली अनेक रसिक प्रेक्षकांची मने

तालुका -राज्यस्तरीय फुगडी स्पर्धेत मिळवले उज्वल यश

खारेपाटण रामेश्वर नगर येथील सखी महिला मंडळ गावामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात नेहमी सक्रिय असते.हळदीकुंकू ,आश्रमभेटी,श्रावण महिन्यात मंगळागौर, हादगा अश्या सारखे विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवते .मंडळातील महिलांना झिम्मा फुगडी गाणी यांची आवड असल्याने सर्वांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला.सौ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ अनुजा ठाकुरदेसाई यांच्या शिकवणीतून एक ते दोन महिन्यांच्या कालावधीतच सखी महिला मंडळ फुगडी संघ पारंगत झाला. आचरा तोंडवली श्रावण महिन्यात घेतलेल्या या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथमच भाग घेऊन या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त.
देवगड चा प्रसिद्ध खवळे गणपती समोर फुगडी सादरीकरनाची मोठी संधी मिळाली.
मालवण -आचरा श्री इनामदार रामेश्वर मंदिर येथे झालेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
खारेपाटण येथे विष्णू मंदिरात बालगोपाळ मंडळाचे यंदा 29वे वर्ष निम्मित फुगडी सादर करण्याची संधी मिळाली.
झुंझार मित्रमंडळ खारेपाटण नवरात्रोत्सव मंडळ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.राजापूर -गुरव वाडी ,नवरात्रोत्सव मंडळ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
राजापूर-तुळसुंदे किंजळादेवी नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.तसेच महिन्या भरातच सखी महिला मंडळ फुगडी संघाच्या यशाचे कौतुक म्हणून रामेश्वर नगर जिजामाता नगर नवरात्रोत्सव मंडळाने सखी महिला मंडळ फुगडी संघाचा सत्कार केला.या फुगडी संघामध्ये अनुजा ठाकूर देसाई, तृप्ती पाटील,प्रणाली कुबल,अमृता कुबल,मनाली होनाळे, शुभांगी गुरव,अंजली कुबल,क्षितिजा धुमाळे, ऋता शिंदे,रंजना ब्रह्मदंडे, योगिता राऊत,जान्हवी सुतार,शीतल कापसे,स्वप्नाली कांबळे, प्राजक्ता ठाकुरदेसाई, अनुप ठाकुरदेसाई, ढोलकी साथ-अथर्व जाधव, आयुष मांगले, वाहतूक व्यवस्था-केतकी ट्रॅव्हल्स चे श्री भाऊ राणे या सर्वांचा महत्वपूर्ण सहभाग आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!