फोंडा-कुर्ली बस चा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, नाहीतर शिवसेना आक्रमक होईल!

शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी प्रमुख नलिनी पाटील यांचा इशारा
फोंडा कुर्ली गावच्या ग्रामस्थांनी परिवहन महामंडळाच्या सहव्यवस्थापक कुबडे यांची भेट घेत बस फेऱ्या अनियमित वेळेत येत असल्याने व गेल्या सहा महिन्यापासून दुपारी १ वाजता सुटणारी बस फेरी रद्द करण्यात आली असून ती देखील बस लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी वैभववाडी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. कुर्ली हे गाव वैभववाडी तालुक्याचे शेवटचे टोक असून या गावात फोंडा येथून एकूण ८ बस फेऱ्या सुटतात. त्याप्रमाणे फोंडा येथून कुर्ली ला येणाऱ्या बस फेऱ्यामध्ये दुपारी १. वाजता सुटणारी देवगड कुर्ली व सायं ५.३० ला सुटणारी देवगड कुर्ली या दोन बस फेऱ्या देवगड आगारातून सुटतात. आता गेल्या ६ महिन्यापासून १ वाजता सुटणारी बस फेरी रद्द करण्यात आली आहे. तसेच ५.३० वाजता सुटणारी बस अनियमितपणे येते त्यामुळे कॉलेजच्या मुलांना त्रास होतो त्यामुळे या दोन्ही बस फेऱ्या देवगड आगारातून रद्द करून त्या बस फेऱ्या कणकवली आगारातून सोडण्यात याव्या व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यात यावी. अन्यथा शाळेतील मुलांना घेऊन आंदोलन करणार असे निवेदन शिवसेना वैभववाडी च्या वतीने देण्यात आले.
या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सौ. नलिनी पाटील महिला आघाडी प्रमुख वैभववाडी, श्री सूर्यकांत परब लोरे जि. प उपविभाग प्रमुख, सूर्यकांत पाटील कुर्ली सरपंच, तुळशीदास पाटील शाखाप्रमुख, बापू चव्हाण सामाजिक कार्यकर्ते व आदी शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
वैभववाडी प्रतिनिधी