रवीकमल डांगी यांनी घेतलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित नायर यांनी केले स्वतः रक्तदान

रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रवीकमल डांगी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली

रवीकमल प्रकाश डांगी यांनी घेतलेल्या रक्तदान शिबिरात 76 जणांनी रक्तदान केले. फिट फ्रेंडस जिम ओरोस या ठिकाणी हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर हे स्वतः रक्तदान शिबिरात सहभागी होत त्यांनी ही रक्तदान केले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष नवीन बांदेकर, विठोबा परब, मनोहर पुरळकर, उदयकुमार जांभवडेकर, सिद्धेश धोत्रे, ऍड. सिद्धेश शेट्ये, डॉ. प्रशांत कोलते, आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून डांगी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली असून रक्तदान शिबिरामुळे सामाजिक जाणीव ठेवून चळवळ उभी करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!