कणकवली, देवगड, वैभववाडी पोलीस पाटील आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू

प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची उपस्थिती

प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत

कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील पोलीस पाटील पदासाठी बिंदू नामावली नुसार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्या नुसार कणकवली 53, देवगड 45, वैभववाडी 37, या तालुक्यातील एकूण 135 जागांसाठी पोलीस पाटील आरक्षण सोडत कणकवली तहसील कार्यालय येथे सुरू झाली आहे. या सोडत प्रसंगी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांच्यासह अन्य उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!