ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन संपन्न

कणकवली/मयुर ठाकूर
सध्याची तरुण पिढी ही सोशल मीडियाच्या विळख्यात सापडली आहे ,व्हॉट्सॲप,फेसबुक, इंस्ट्राग्राम ,ट्विटर अशा वेगवेगळ्या माध्यमातून मुले या सोशल मीडियाच्या आहारी जातात त्यामुळं सध्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे वाढताना दिसताहेत
याच अनुषंगांने विद्यार्थ्यांच्या मनात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे इथे कणकवली पोलिस उपनिरीक्षक व्ही.एम.चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत "सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन " संप्पन झाले .या प्रसंगी मुलांना सोशल मीडियाचा वापर कसा करावा तसेच सायबर क्राईम म्हणजे काय? त्याचे होणारे परिणाम आणि त्याविषयी घ्यावी लागणारी सुरक्षितता याचे मार्गदर्शन श्री.चव्हाण साहेबांनी केले तसेच मधुरा कॉम्प्युटर च्या संचालिका रश्मी बाइत मॅडम यांनी ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
याप्रसंगी कणकवली उपनिरीक्षक , व्हीं.एम चव्हाण,मधुरा कॉम्प्युटर च्या बाइत मॅडम ,कॉन्स्टेबल एम. व्हि.कोलते , आयडीयल कॉम्प्युटर च्या सौ.घाडी मॅडम
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे ,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल सर ,सल्लागार श्री.डी.पी.तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम ,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.





