आचऱ्यात ठाकरे गटाला धक्का ; माजी उपसरपंचाचा भाजपात प्रवेशविकासासाठी भाजपची कास-पाडूरंग वायंगणकर

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. आचरा ग्रा. प. चे माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर आणि सौ. वायंगणकर यांनी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
याबाबत पाडूरंग वायंगणकर यांच्याशी संपर्क साधल्यावर आपल्या भागातील तांडेलवाडी ते समुद्र किनारा तसे इतर विकास कामे भाजपच्याच माध्यमातून होवू शकतो याबाबत खात्री झाल्यामुळेच आपण दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, माजी जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, संतोष गावकर, आचरा विकास सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, मंगेश गावकर यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!