खारेपाटण -भुईबावडा एसटी च्या अनियमिततेमुळे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे होत होते हाल

आ. नितेश राणे यांनी एसटी विभागीय नियंत्रकांना तातडीने फोन करताच खारेपाटण-भुईबावडा एसटी पोचली खारेपाटण स्टॅन्ड ला वेळेत

शालेय महाविद्यालयिन विद्यार्थी ,प्रवासी यांची गैरसोय झाली दूर

खारेपाटण येथून सुटणारी भुईबावडा एसटी ही गेले काही दिवस वेळेवर येत नसल्याने प्रवासी ,विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.खारेपाटण मधून भुईबावडा एसटी चा टायमिंग दुपारी 12:45 चा असून देखील ही बस गेले चार दुपारी 3च्या नंतर खारेपाटण बसस्टँड ला येत येत होती त्यामुळे या बस ने प्रवास करणारे प्रवासी व कॉलेज चे विद्यार्थी यांचे फारच हाल होत आहेत. सदर घटना ही आमदार नितेश राणे यांच्या कानावर पडताच त्यांनी एसटी चे अधिकारी यांना कॉल करून भुईबावडा एसटी खारेपाटण स्टॅन्ड ला नियमितपणे वेळेवर पाठवण्याचे आदेश दिले त्यानुसार भुईबावडा बस ही यापुढे खारेपाटण स्टॅन्ड ला वेळेवर पाठवून प्रवासी व विद्यार्थ्यांचे होणारे हाल दूर करण्याचे आश्वासन एसटी च्या विभागीय नियंत्रकानी आमदार नितेश राणे यांना दिले.खारेपाटण येथून सुटणारी भुईबावडा एसटी वर अनेक प्रवासी विद्यार्थी अवलंबून आहेत ,खारेपाटण पासून भुईबावडा व भुईबावडा लाईन ची सर्व गावे ही खारेपाटण पासून लांब असल्याने ,खारेपाटण येथून सुटणारी दुपारची खारेपाटण भुईबावडा बस ही विद्यार्थी व प्रवासी यांच्यासाठी महत्त्वाची बस आहे .आमदार नितेश राणे यांनी तत्परतेने एसटी च्या विभागीय नियंत्रकांना फोन करून खारेपाटण भुईबावडा बस ही नेहमी वेळेत खारेपाटण स्टॅन्ड ला आली पाहिजे असे सक्त आदेश दिल्याने आता ही बस वेळेवर खारेपाटण स्टॅन्ड ला येणार असल्याचे समजल्याने प्रवासी व विद्यार्थी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!