सिंधुदुर्गातील तरुण, होतकरू मुलांना ग्लोबल ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी..

सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातील होतकरू तरुणांसाठी कुडाळ व कणकवली येथे ह्युंदाई या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या डीलरशिपमध्ये, माई ह्युंदाईमध्ये नोकरीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. स्थानिक युवकांनी याचा अवश्य लाभ घ्यायला हवा.
माई ह्युंदाई ही ह्युंदाई मोटर्सची अगदी सुरुवातीची डीलरशीप. गेल्या 25 वर्षात माई ह्युंदाईने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो ग्राहकांना ह्युंदाई कार्स विकल्या आहेत. यानिमित्ताने या ग्राहकांशी माई ह्युंदाईची नाळ जुळली आहे. नवीन हायवे, पर्यटन व्यवसाय यामुळे सिंधुदुर्गात वाहन उद्योग जोरात आहे. माई ह्युंदाईला त्यांच्या वर्कशॉप्समध्ये फ्रेश तसेच अनुभवी टेक्निशियन्स, सुपरवायझर्स, सर्व्हीस ऍडवायझर्स यांची आवश्यकता आहे. स्थानिक परिसराची माहिती तसेच वाहन दुरुस्तीबद्दल आवड व थोडीशी माहिती असेल तर टेक्निशियन्स पदासाठी कुडाळ व कणकवली येथे लगेच नोकऱ्या उपलब्ध आहेत. दोन वर्षांच्या अनुभवी टेक्निशियन्सना सुपरवायझर किंवा ऍडवायझर पदांवर काम करण्याचीही संधी उपलब्ध आहे. टेक्निशियन्स महिन्याला 12 ते 15 हजार इतकी कमाई करू शकतात, तर सुपरवायझर 18 ते 20 हजारांपर्यंत कमाई करू शकतात. ज्यांना या कामांमध्ये आवड आहे, मनापासून काम करण्याची इच्छा आहे, त्या सर्वांनी उमेश पाटील यांच्याशी 9623245800 या नंबरवर लगेचच संपर्क साधावा, किंवा career@maihyundai.com वर आपली संपूर्ण माहिती/ बायोडेटा मेल करावा. निवड झालेल्या उमेद्वाराना ह्युंदाई कंपनीच्या वतीने पूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ज्या ग्रॅज्युएट युवकांना ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सेल्स तसेच बॅक ऑफिसमध्ये काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठीही अनेक संधी माई ह्युंदाईकडे उपलब्ध आहेत. इच्छुकांनी वरील फोन नंबरवर व मेल आयडी वर आपली माहिती कृपया पाठवावी..

ब्युरो न्यूज । सिंधुदुर्ग

error: Content is protected !!