“होऊ दे चर्चा” च्या हटवलेल्या बॅनरची कणकवलीत चर्चा

“होऊ दे चर्चा” व “चर्चा तर होणारच” हे दोन्ही बॅनर हटवल्यानंतर पुन्हा लावले आमने-सामने

कार्यकर्ते आमने-सामने नाहीत, बॅनर मात्र आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा चर्चा

कणकवऊ

कणकवलीत “होऊ दे चर्चा” या युवासेनेच्या कार्यक्रमानंतर आता कणकवलीत बॅनर वॉर ची चर्चा रंगू लागली आहे. “होऊ दे चर्चा” चे बॅनर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली पटवर्धन चौक व श्रीधर नाईक चौक या ठिकाणी लावल्यानंतर दोन दिवसांपूर्वी हे बॅनर काढून त्या ठिकाणी भाजपा चे बॅनर लावण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा ते लावलेले बॅनर काढून त्या जागी सुशांत नाईक यांचे बॅनर परत लावले गेले. हे बॅनर वॉर सुरू असतानाच कणकवली नगरपंचायतने यात बॅनरच्या वॉर उडी घेतली. आणि आज सोमवार पासून या अनधिकृत बॅनर विरोधात हटाव मोहीम राबवण्यास सुरुवात केली. “होऊ दे चर्चा” च्या बॅनर ला उत्तर देणारा आमदार नितेश राणेंचा “चर्चा तर होणारच” अशा आशयाचा विकास कामांचा आणलेला निधी दर्शवणारा बॅनर देखील हटवला गेला. परंतु यावेळी दोन्ही बाजूंनी बॅनरची फी नगरपंचायत जवळ भरणा करण्यात आली व हे हटवलेले बॅनर समोरासमोर पुन्हा श्रीधर नाईक चौक येथे लावण्यात आले. त्यामुळे होऊ दे चर्चा या कार्यक्रमापाठोपाठ आता कणकवलीत या हटवून पुन्हा लावलेल्या बॅनर ची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान कणकवली नगरपंचायत पथक आज श्रीधर नाईक चौकात दाखल झाले सकाळी बॅनर हटवले. काही वेळात दोन्ही बाजूने बॅनर ची फी नगरपंचायत कडे भरणा केली व त्यानंतर पुन्हा आमने-सामने बॅनर लावले गेले. जरी भाजपा व शिवसेना कार्यकर्ते कणकवलीत होऊ दे चर्चा साठी आमने-सामने आले नसले तरी बॅनरच्या माध्यमातून मात्र आमने-सामने आलेल्या युवा सेना व भाजपा यांची चर्चा मात्र कणकवलीत जोरदार सुरू झाली.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!