निवृत्त केंद्रप्रमुख सुरेश जाधव यांचे निधन

निवृत केंद्रप्रमुख तथा वरवडे – बौद्धवाडी येथील रहिवासी सुरेश तुकाराम जाधव (६८) यांचे शनिवारी पहाटे ४ वा. डोंबिवली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. सुरेश यांनी शिक्षकी पेशात कार्यरत असताना कित्येक विद्यार्थी घडविले. भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यामध्येही त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून, जावई, नात, भावजय, तीन पुतणे असा परिवार आहे. निवृत्त प्राथमिक शिक्षिका शैलजा जाधव यांचे ते पती होत.

कणकवली,प्रतिनिधी

error: Content is protected !!