इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला उपस्थित रहा

जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर यांचे आवाहन
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ येथे कीर्तन करणार आहेत. वासुदेवानंद ट्रेड सेंटर कुडाळ येथे हा कीर्तन सोहळा हजारो वारकरी आणि श्रोत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कीर्तन सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांनी आपल्या उपस्थितीने इंदुरीकर महाराजांचे स्वागत करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर यांनी केले आहे.
उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. इंदुरीकर महाराजांचा किर्तन सोहळा कुडाळ येथे होणार आहे. त्यामुळे समाजाला नवनव्या गोष्टींचे आकलन होणार आहे. कीर्तन संस्कृती चे वारकरी हे एक मुख्य घटक आहेत.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंदुरीकर महाराजांचे होणारे कीर्तन म्हणजे वारकरी बंधू-भगिनींना एक पर्वणी निर्माण झालेली आहे. या कीर्तनाचा प्रत्येक वारकऱ्याने व जनतेतील प्रत्येक घटकाने आनंद घ्यावा, त्यासाठी या कीर्तनात सहभागी व्हावे आणि इंदुरीकर महाराजांचे कीर्तन श्रवण करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकरी बंधू-भगिनींना अध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी