“होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न” अभियानांतर्गत उद्या कणकवलीत कॉर्नर सभा

मालवण तालुक्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या कणकवलीच्या कॉर्नर सभेकडे जिल्ह्याचे लक्ष

अभियानात सहभागी होण्याचे ठाकरे गटाचे आवाहन

कणकवली पटवर्धन चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ ऑक्टोबर सायंकाळी ५.३० वाजता “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” अभियान या अंतर्गत कॉर्नर सभा घेतली जाणार आहे. मालवण तालुक्यामध्ये ठाकरे गट व भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण बनलेले असतानाच आता कणकवलीच्या या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना,युवासेना,महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त कणकवली तालुक्यात कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत.
यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत,अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, महिला आघाडीच्या उपनेत्या श्रीमती मीना कांबळी ,जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर ,आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,सचिन सावंत हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधी, व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
जिल्हाप्रमुख संदेश पारकर , तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर,
उमेश वाळके, राजू राठोड, उत्तम लोके, वैदेही गुडेकर यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!