कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास बुलढाणा येथे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

यापूर्वी या काव्यसंग्रहास मिळाले आहेत चार पुरस्कार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला बुलढाणा येथे राज्यस्तरीय पुरस्कार विदर्भातील सुप्रसिद्ध साहित्यिक किरण डोंगरदिवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील मानव विकास बहु सामाजिक संस्था तथा विवेकानंद सार्वजनिक वाचनालय डोणगाव, तालुका मेहकर च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार सोहळ्यात दिवंगत दौलत राजाराम खोडके स्मृती काव्य गौरव पुरस्कार सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास रोख रक्कम,सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी सुभाष पळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच प्रा. जीवनसिंह दिनोरे, , प्रा. रवींद्र साळवे, कवी डॉ विशाल इंगोले, राजेंद्र पळसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण हा काव्यसंग्रह अल्पावधीत बहुचर्चित झाला आहे. याआधी या काव्यसंग्रहास चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. विजय निंबाजी पळसकर, सुनील दौलत खोडके, भीमराव तुकाराम मोरे यांज संयोजन केलेल्या या कार्यक्रम यशस्वीतेसाठी जफर मन्नान, अमोल खोडके, प्रदीप मोरे, अनिल खोडके, राम लहाने, ओम भालेराव, प्रदीप खोडके, सुमित खोडके यांनी मेहनत घेतली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!