राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या प्रांतिक सदस्यपदी दिलीप वर्णे

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीपत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित दादा पवार गटाच्या प्रांतिक सदस्य पदी दिलीप वर्णे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नियुक्ति पत्र दिलीप वर्णे यांना मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे प्रदान केले. त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रज्ञा परब, कुडाळ महिला तालुका अध्यक्ष पूजा पेडणेकर, देवगड़ तालुका अध्यक्ष रशीद खान, कुडाळ तालुका अध्यक्ष आर, के. सावंत जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, वैभववाड़ी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे, मनोहर साटम, ओ बी सी जिल्हा अध्यक्ष सर्वेश पावस्कर, जिल्हा प्रतिनिधि केदार खोत आदि उपस्थित होते.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!