ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी.

कणकवली/मयुर ठाकूर.

सर्व देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी केली गेली.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत केंद्र सरकारने “स्वच्छ भारत अभियानाचे” आयोजन केले होते.या अभियानाच्या माध्यमातून सर्व देशभरात स्वच्छता मोहीम राबविली गेली.विविध संघटना-संस्थान्नी देखील त्यात सक्रिय सहभाग घेत स्वच्छता अभियान राबविले.या भारत सरकारच्या अभियानामध्ये आयडियल प्रशालेने देखील सहभाग घेतला.यात विद्यार्थी-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते आणि प्रशालेतील आवारात स्वच्छता मोहीम राबवली.
भारतीय जनमानसावर महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा प्रभाव आहे.भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो.त्यामुळे त्यांची जयंती भारतात उत्साहात साजरी केली जाते.
भारतात त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांच्या विरोधात लढा सुरू केला. 1919 सालचे असहकार आंदोलन,1930 सालचं सविनय कायदेभंग आणि 1942 सालचे “चले जाव आंदोलन” ही त्यांनी उभारलेल्या आंदोलनातील सर्वात मोठी आंदोलनं. त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आणि भारताला सविनय मार्गाने स्वातंत्र्य देखील मिळालं. 
देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देखील स्वातंत्र्य लढयात स्वत:ला झोकून घेतले होते. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केली होती.
अशा या दोन्ही थोर स्वातंत्र्यवीरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे तालुका कणकवली या प्रशालेत देखील राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दोघांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री. हेमंत पाटकर तसेच शिक्षिका सिद्धी वरवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सर्व शिक्षकांनी आपल्या सुमधुर आवरात “रघुपती राघव राजाराम”हें गीत सादर केले.

प्रसंगी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,आयडियल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई तसेच सहकारी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमचे सूत्रसंचालन सौ. शीतल बांदल यांनी केले.

error: Content is protected !!