मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे किल्ले स्वच्छता मोहिम

आचरा मालवण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे सिंधुदुर्ग आणि राजकोट किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवत ऐतिहासिक किल्ले संवर्धनाचा संदेश दिला.
महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता हीच सेवा अभियान राबविले जात आहे तसेच साडेतीनशे वर्ष राज्याभिषेकाची औचित्य साधून शासनाच्या कौशल्य विकास रोजगार नाविन्यता आणि उद्योजकता या मंत्रालयीन विभागाच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील साडेतीनशे गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्या अनुषंगाने शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अधिपत्याखाली सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी ही मोहीम राबवली या स्वच्छता मोहिमे अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण या संस्थेने एक ऑक्टोबर रोजी राजकोट मालवण या किल्ल्याची स्वच्छता केली या स्वच्छता मोहिमेमध्ये राजकोट वरील मंदिर व त्याच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली परिसरामधील वाढलेली झाडी रान काढण्यात आले तसेच सर्व प्रकारचा प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला 2 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेमध्ये किल्ल्यावरील श्री शिवराय मंदिराच्या आतील व बाहेरील भागाची स्वच्छता करण्यात आली तसेच सर्व प्रकारच्या प्लास्टिक बॉटल्स पिशव्या गोळा करण्यात आल्या आणि किल्ल्याच्या तटबंदीकडे जाण्याच्या मार्गावरील वाढलेली झाडी व रान साफ करून वाट मोकळी करण्यात आली तटबंदीवरील रान काढण्यात आले. या स्वच्छता मोहिमेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निदेशक अमित खेडेकर, प्रणय परब ,संतोष सावंत भोसले ,ज्ञानदेव मायबा, कमलेश धर्णे, संदिप सावंत दिपेश नारिंग्रेकर कर्मचारी दिपक घोगळे ,संतोष परब,भरत देऊलकर,संतोष गोवेकर निक्सन फर्नांडिस, सर्व प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला तसेच या स्वच्छता मोहिमेसाठी स्थानिक नगरसेवक गणेश कुशे, ममता वराडकर किल्लेकारी परिवार सदस्य, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पर्यटक यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच या दोन्ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्राचार्य सचिन संखे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
आचरा–अर्जुन बापर्डेकर