भारत सरकारच्या हार्टीकल्चर बोर्ड वर संदीप राणे यांची निवड

स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघाचे सक्रिय सदस्य माननीय श्री संदीप राणे यांची भारत सरकारच्या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड वर नॉमिनेटेड सदस्य म्हणून तीन वर्षाच्या कालावधी करता नेमणूक करत असल्याचे पत्र अवर सचिव भारत सरकार यांनी निर्गमित केले आहे कोकणातील आंबा काजू नारळ इत्यादी फळ पिकांना त्यामुळे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे संपूर्ण भारतातून एकूण सात सदस्यांची निवड झाली आहे त्यापैकी एक श्री संदीप राणे हे आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्याकडून शेतकरी वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत.
कणकवली (प्रतिनिधी)





