आचरा येथे गणपती बाप्पांचे विसर्जन


आचरा–अर्जुन बापर्डेकर. आचरा येथील गणपती बाप्पांचे साश्रू नयनांनी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या गजरात विसर्जन करण्यात आले.
आरती,भजन,फुगडी च्या गजरात गेले नऊ दिवस रंगून गणेशाच्या आराधनेत भाविक तल्लीन होऊन गेले होते. गणेशत्सवात पावसाचेही विघ्न नसल्याने गणेशोत्सवाचा उत्साह वाढला होता. अनंत चतुर्दशी दिवशी आचरा येथील पारवाडी खाडीत,पिरावाडी समुद्र किनारी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

error: Content is protected !!