पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या तळवडे येतील मामाच्या घरच्या गणपतीची महती मोठी

तळवडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे परबवाडी येतील थळकर कुटूबिय मामाच्या घरच्या गणपतीची महती मोठी आहे. हया गणपतीला 250 वर्षापूर्वी पासुनची परंपरा लाभली आहे.गणपती उत्सव म्हटला की एक एकजुटीचे प्रतीक मानले जाते. कोकणामध्ये अश्या अनेक कुटुंबामध्ये अनेक वर्षांपूर्वीची परंपरा लाभली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील थळकर कुटुंबामध्ये असेच एकजुटीचे प्रतिबिंब दिसून आले.
ह्या थळकर कुटुबात एकजुटीने
गणपती उत्सव साजरा केला जातो या गणपती उत्सवाला जवळपास अंदाजे अडीचशे वर्षांपूर्वीची परंपरा लाभली आहे. कुटुंबातील 20 कुटुंब एकत्र येऊन हा उत्सव दरवर्षी आनंदात व गुणगोविंदाने साजरा करतात .महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र द्र चव्हाण यांच्या मामाच्या घरी हा गणपती उत्सव साजरा केला जातो .या उत्सवाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण पण येऊन दर्शन घेऊन जातात तसेच त्यांचे आई-वडील या गणपतीला आवर्जून दरवर्षी येतात . तळवडे येथील थळकर कुटुंबीयांच्या गणपतीला अडीचशे वर्षांपूर्वीची परंपरा लाभली असून या कुटुंबातील जवळपास शंभरच्या वर व्यक्ती एकत्र येऊन हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करतात. अकरा दिवस या ठिकाणी गणपतीचे पूजन केले जाते .या ठिकाणी गणपती नैवेद्य तसेच भजन आरती तसेच सर्व सर्व धार्मिक कार्यक्रम एकजुटीने गुणगोविंदाने केले जातात, कोकणातील एकजुटीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. कोकणामध्ये गणपती उत्सव हा एकजुटीचे एक प्रतीक मानले जाते. मुंबई तसे अन्य राज्यात नोकरी निमित्त वांस्थव्यास असलेले कोकणातील व्यक्ती या गणपती उत्सवाला कोकणात एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात . या कुटुंबातील अनेक व्यक्ती परगावी असतात तरीपण गणपती उत्सवाला एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या चांगल्या प्रकारे गुणगोविंदाने साजरा करतात .मोठे कुटुंब असून या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती या उत्सवाला सहभागी होते.
रामचंद्र कुडाळकर तळवडे





