आमदारकीसाठी इच्छुक पण पक्षाचा आदेश आल्यास केसरकर, तेलींचा प्रचार करणार…

संजू परब; सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडे १५ दिवसात तोडण्याची मागणी…

सावंतवाडी, मी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून आमदारकी लढविण्यास आजही इच्छुक आहे. मात्र आयत्यावेळी पक्षाने दीपक केसरकरांना किंवा राजन तेलींना तिकीट दिल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी मी निश्चितच प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी भूमिका सावंतवाडी माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे प्रवक्ते संजू परब यांनी आज येथे मांडली. दरम्यान सावंतवाडी शहरात असलेली धोकादायक झाडे येत्या १५ दिवसात तोडा, अन्यथा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालू, असा इशारा त्यांनी दिला. कालचा प्रकार दुर्दैवी होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धोकादायक झाडांचे “ऑडीट” होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. परब यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, बंटी पुरोहीत आदी उपस्थित होते. यावेळी श्री. परब म्हणाले, या ठिकाणी गेली २० वर्षे मी राजकारण आणि समाजकारणात काम करीत आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभेची आमदारकी लढविण्यास मी आजही इच्छुक आहे. माझ्या सोबत मनोज नाईक सुध्दा इच्छुक आहेत. आम्हाला संधी मिळावी यासाठी आमचे प्रयत्न असतील. परंतू आयत्यावेळी केसरकर किंवा राजन तेलींचा पक्षाकडून विचार झाल्यास आम्ही निश्चितच त्यांच्यासाठी प्रयत्न करू.

ते पुढे म्हणाले, दोन युवकांच्या अंगावर भेडले माड पडून सावंतवाडीत घडलेला अपघात दुर्देवी आहे, असा प्रसंग कोणावर येनू नये. आम्ही त्या दोन्ही युवकांच्या कुटुंबीयांच्या दुखात सहभागी आहोत, त्यांना जास्तीत जास्त शासनाकडुन मदत मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. दरम्यान हा प्रकार होण्यास सावंतवाडीतील जीर्ण झाडे जबाबदार आहेत.. असाच प्रकार ८ वर्षापुर्वी घडला होता. यात ही दोन युवकांचा जीव गेला होता. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेवून पालिका प्रशासनाने शहरातील जीर्ण झाडे तात्काळ तोडावीत. विशेषतः आठवडा बाजाराच्या परिसरात असलेली न्यायालयाच्या परिसरातील झाडे तोडावीत, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालू, असा इशारा श्री. परब यांनी दिला

ब्युरो न्यूज ।सावंतवाडी

error: Content is protected !!