साकेडीतील शेख कुटुंबीयांचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याकडून सांत्वन

शेख कुटुंबीयांची भेट घेत केली आर्थिक मदत

तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत गेलेला कणकवली तालुक्यातील साकेडी – मुस्लिमवाडी येथील तरुण सुफयान दिलदार शेख (23) हा तरुण बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज गुरुवारी या शेख कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे संत्वन केले. तसेच दिलदार शेख यांचा एकुलता एक मुलगा या घटनेत गमावल्यामुळे त्यांना धीर देखील दिला. तसेच आर्थिक मदतीचा हात देखील पुढे केला. यावेळी त्यांच्यासोबत युवा सेनेचे विभाग प्रमुख किरण वर्दम, तालुका समन्वयक तेजस राणे, हुसेन शेख अन्य उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!