जनसेवा प्रतिष्ठान तर्फे सानिया कदम हिचा सत्कार…

सावंतवाडी – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, गरिबी मध्ये शिक्षण घेत सांगेली हायस्कूल मधुन बारावी विज्ञान मध्ये ७७% माकस् मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेली, वेर्ले पंचक्रोशीतही अव्वल ठरलेली व आता वैद्यकीय क्षेत्रातील नर्सिंग या विभागातील बी.एस्सी. नर्सिंग या शाखेत शासकीय कोट्यातून प्रवेश मिळविलेली कु. सानिया श्यामराव कदम हिचा गणेशोत्सवाचे औचित्य साधून
जनसेवा प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग तर्फे सन्मान चिन्ह व शैक्षणिक साहित्य भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते धोंडी राऊळ व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वसंत मोरजकर, श्यामराव कदम,गणु कदम , यशवंत घाडी, लक्ष्मण कदम, सुभाष कदम, सारिका कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावाची हि सुकन्या असुन तीच्या यशाबद्दल तीचे पंचक्रोशी मध्ये कौतुक करण्यात येत आहे.

error: Content is protected !!