पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांचे निधन…

सावंतवाडी : बांदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सीताराम माने यांचे हृदयविकाराचा तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. माने यांचे मुळ गाव महाड. सध्या ते सावंतवाडी येथे राहत होते. ते बांदा पोलीस ठाण्यात सुरुवातीला जमादार होते. स्वात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली. त्यांना प्रशासक बाबींची उत्तम जाण होती. त्यांनी अनेक गुन्ह्याचा तपास योग्य रितीने केला होता. त्यांच्या अचानक निधनाने पोलीस कर्मचाऱ्यांत शोककळा पसरली आहे. पोलीस निरीक्षक असलेले प्रदिप माने यांचे ते भाऊ होत.