आयडीयल कॉलेज च्या मुलांनी भरवले ‘आयडीयल कवी संमेलन’

ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल आणि कॉलेज मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक पाऊल नेहमीच पुढे

कणकवली/मयुर ठाकूर.

योग्य शिक्षणासोबत मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळविण्यासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल आणि कॉलेज यांचा स्तुत्य उपक्रम 14 सप्टेंबर रोजी पार पडला. या मध्ये कॉलेज च्या मुलांनी स्वरचित कविता तसेच इतर आवडीच्या वेगवेगळ्या भाषेतील कविता सादर करत भरवले ‘आयडीयल कवी संमेलन’.
कविता संमेलनात कु.सेजल देसाई तर कवी व गझलकार कु.जगदीश पटेल यांनी या कार्यक्रमाला आगळे वेगळे स्वरूप दिले. कार्यक्रमाचे खास आकर्षण कु.साराह खान जिने अगदी 17 वर्षात स्वरचित व स्वलिखित स्वतःचे पुस्तकं आयडियल कडून प्रकाशित केले. मेहविश शेख ,तानिया मल्होत्रा,नमिरा शेख यांनी विविध कविता सादर केल्या. अभ्यासक्रमासोबत मुल अवांतर वाचन करतात, लिहितात, बोलतात, मत मांडतात हे खूपच कौतुकास्पद आहे.मुलांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे संस्थाचालक, मुख्याध्यापिका तसेच सर्व सहकारी शिक्षक व पालक वर्गातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!