साकेडी मधील तरुण तारकर्ली समुद्रात बुडाला
बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू
तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत गेलेला कणकवली तालुक्यातील साकेडी – मुस्लिमवाडी येथील तरुण सुफयान दिलदार शेख (23) हा तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. सुफयान हा आपल्या वाडीतील व अन्य मित्रा सोबत तारकर्ली येथे गेला होता. या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडल्याची माहिती त्याच्या सोबत अन्य तरुणांनी दिली. अन्य काही तरुणांवर मालवण व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिगंबर वालावलकर /कणकवली