कणकवली कॉलेज ज्युनिअर विभाग बॅडमिंटन मध्ये जिल्ह्यात प्रथम.

कणकवली/मयुर ठाकूर.

 क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद,सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय  बॅडमिंटन  स्पर्धा आज दिनांक 12/09/2023  रोजी ओरोस क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या.  या स्पर्धेमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात कणकवली कॉलेज कणकवली कनिष्ठ विभागातील १९ वर्षाखालील  मुलांच्या संघाने जिल्हात प्रथम क्रमांक पटकावला. 

१९ वर्षाखालील बॅडमिंटन मुले प्रथम क्रमांक
1)धनराज शंकर खोटलेकर
2)अमन आसिफ बागवान
3)जयेश सुरेश कार्ले
4)कुणाल नीलेश नारकर
5)मयुरेश सुनील कुबल
या सर्व खेळाडूंची कोल्हापूर विभागीय स्पर्धेला निवड झाली.
सर्व यशस्वी खेळाडूंचे शिक्षण प्रचारक मंडळ, कणकवली च्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री. विजयकुमार वळंजू व सर्व संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. ए. पी. चव्हाण सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी यांनी अभिनंदन केले आणि सर्वांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका प्रा. जयश्री कसालकर यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!