आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पदार्थ पाककला स्पर्धेत डॉ. सई लिंगवत प्रथम..

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने वेंगुर्ले येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये पौष्टिक तृणधान्य पदार्थ पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत शाळेच्या माता पालक वर्गाने यांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेत डॉ. सई संजीव लिंगवत यांनी प्रथम सौ. साक्षी संदीप पेडणेकर यांनी व्दितीय तर तृतीय क्रमांक सौ. श्वेता अखिल आरोसकर मिळविला.
विजेत्यांचे स्पर्धकाना राणी लक्ष्मीबाई कन्याशाळाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पेडणेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पारितोषिक देण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर केंद्र प्रमुख महादेव आव्हाड, मुख्याध्यापक शंकर सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मारुती कुडाळकर, बाबुराव मयेकर शिक्षिक वर्ग व शिक्षक पालक संघ सदस्य उपस्थितीत होते.
यावेळी सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.