कुडाळात घुमला गोविंदा रे गोपाळाचा गजर

निलेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडीचा थरार
निलेश जोशी | कुडाळ : माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत कोंकणातील पहिल्या साडे पाच लाखाच्या दहीहंडीसाठी सहभागी झालेल्या राज्यातील गोविंदा पथकांनी रचलेल्या दहीहंडीच्या थरांरानी हजारो कोंकणवासियांच्या डोळ्यांचे पारणे फिटले
यावेळी माजी खासदार डॉ निलेश राणे भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजन तेली दत्ता सामंत रणजित देसाई मनिष दळवी संध्या तेरसे दादा साईल संजय वेंगुर्लेकर बंड्या सावंत संजू परब आनंद शिरवलकर अशोक सावंत विनायक राणे प्रकाश मोर्ये रुपेश कानडे नागेश आईर राकेश कांदे बाबा परब विलास कुडाळकर गणेश भोगटे पप्या तवटे देवेंद्र सामंत प्राजक्ता बांदेकर दीपक नारकर अजय आकेरकर मंगेश चव्हाण राजेश पडते नागेश नेमळेकर मोहन सावंत आबा धडाम योगेश घाडी नूतन आईर अदिती सावंत जिल्हातील गोविंदाप्रेमी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते
कोकणात श्रावण महिन्यापासून खऱ्या अर्थाने सणासुदीला सुरुवात होते आपल्या अनेक सणामध्ये गोकुळाष्टमी हा सण तेवढाच दिमाखात साजरा केला जातो गेल्या काही वर्षांत मुंबईच्या धर्तीवर कोंकणातही हा सण जल्लोषी वातावरणात साजरा केला जातो विविध संस्था मंडळे राजकीय पक्ष दहीहंडीच्या माध्यमातून गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहेत आतापर्यंत कोंकणात साडेपाच लाखाची दहीहंडी झाली नाही अशा प्रकारची 5 लाख 55हजार 555 ची दहीहंडी माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आज 8 सप्टेंबरला कुडाळ येथे नवीन डेपोच्या भव्य मैदानावर साकारली आहे या नेत्रदीपक सोहळ्याला जल्लोषी वातावरणात सुरुवात झाली सायकाळी साडे पाच पासून या सोहळ्याला सुरुवात झाली विशेष म्हणजे या सोहळ्याला सिनेसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेत्री मानसी नाईक, अभिनेता भाऊ कदम, अभिनेता देवदत्त नागेतसेच अन्य प्रसिद्ध गायक आणि कलाकार या दहीहंडी उत्सवात कुडाळमध्ये दाखल झाले आहेत प्रसिद्ध बॉलीवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक सचिन गुप्ता आणि त्यांचे सहकलाकार यांचा लाईव्ह संगीत शो बरोबर प्रसिद्धप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रिवा अरोरा सह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती आहे दही हंडी हा युवकांचा साहसी खेळ आहे या खेळाला गोविंदा पथकांचे थर रचून प्रोत्साहन देण्यात आले सिंधुदुर्गसह मुंबई रायगड ठाणे रत्नागिरी येथील गोविंद पथके सहभागी झाली आहेत
बॉक्स
मेरी मिट्टी मेरा देश अभियान
या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील मेरी मिट्टी मेरा देश हे अभियानसुद्धा या ठिकाणी राबविण्यात येणार आहे प्रत्येक गावातून मातीचा कलश या ठिकाणी आणण्यात येणार आहे ही सर्व माती या ठिकाणी असणाऱ्या भव्य कलशामध्ये ठेवण्यात आली हा कलश राज्याकडून देशाकडे पाठविण्यात येणार आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ