मंत्री दीपक केसरकर यांच्या फंडातून मंजूर झालेल्या वजराठ चिरेखण,कासलेवाडी सोन्सुरकरवाडी मार्गे होडावडे, भटवाडी रस्त्याचां काँक्रिटीकरण कामाचा करण्यात आला शुभारंभ

सावंतवाडी
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या फंडातून वेंगुर्ले तालुक्यातील वजराठ चिरेखण
कासलेवाडी सोन्सुरकरवाडी मार्गे होडावडे, भटवाडी रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्याचा शुभारंभ
वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख श्री नितीन मांजरेकर याच्या उपस्थितीत करण्यात आला.या कामासाठी 5 लाख रुपये चां निधी मंजूर झाला आहे.
यावेळी वजराठ सरपंच सौ. अनन्या आनंद पुराणिक, उपसरपंच सौ. प्रियांका साईप्रसाद केरकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. बाबुराव परब, सामाजिक कार्यकर्ते श्री अण्णा वजराठकर, ग्रा.प. सदस्य सौ. दीपिका राणे, ग्रा.प. सदस्य सौ. नम्रता देसाई, ग्रा.प. सदस्य श्री. नामदेव कांदे, मनोहर परब, प्रेमानंद सावंत भोसले, प्रताप राणे, साईप्रसाद केरकर, नितीन सावंत, अ.बा. परब, प्रवीण गावडे, बंटी सोनसुरकर, सुरेश कसले, चंद्रकांत कासले, संजय देसाई, दिपू सोनसुरकर उपस्थित होते. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.