कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांची बदली

गेले काही महिने डॉ. धर्माधिकारी आले होते राजकीय टार्गेटवर
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांची उस्मानाबाद येथील कळंब उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी विनंती बदली करण्यात आली आहे. गेले काही दिवस डॉ. धर्माधिकारी हे राजकीय दृष्ट्या टार्गेट वर आले होते. आमदार नितेश राणे यांनी देखील त्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर याबाबत उलट सुलट प्रतिक्रिया देखील उमटल्या होत्या. त्यामुळे त्यांची बदली ही जरी विनंती बदली दाखवण्यात आलेली असली तरी ती राजकीय दबावाखाली झाली? की प्रशासकीय याची आता चर्चा सुरू होऊ लागली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





