“श्रावणसरीं”च्या माध्यमातून महिलांच्या विविध कलागुणांना मिळाले व्यासपीठ

मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या वतीने आयोजन
फुगड्यांच्या विविध प्रकारानी आणली कार्यक्रमात रंगत
महिलांना रोजच्या कामातून एक विरंगुळा मिळावा व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता गेली अनेक वर्ष मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीच्या वतीने श्रावण सरी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील महिलांनी उखाणे घेणे, फुगड्या घालणे, यासह अन्य कलागुण सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या नीलम सावंत पालव यांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. कणकवलीच्या माजी नगरसेविका समृद्धी संदेश पारकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी फुगड्यांचे विविध प्रकार, उखाणे, हळदी कुंकू सोबतच श्रावण महिन्यातील सण समारंभाचे वैज्ञानिक महत्त्व डॉ. वर्षा करंबेळकर -सावंत यांनी अतिशय नेटकेप्रमाणे विशद केले. सोबतच काही आरोग्य विषयक सल्ले सुद्धा दिले. या कार्यक्रमासाठी कणकवली शहरा सह देवगड,नाटळ, फोंडा, जानवली, कलमठ, शिरवलं येथूनही महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समृद्धी पारकर, शिल्पा सरूडकर, विना राणे, भाग्यश्री रासम,शितल पारकर, संजना साटम, पुनम म्हापसेकर, रीमा साटम, दिव्या साळगावकर,रोहिणी पिळणकर,नेहा पारकर, श्वेता घाणेकर, अमिता सावंत,राधिका पालव, ज्योती मुणगेकर, सुप्रिया सरंगले, गौरी पिळणकर, शाली पिळणकर,प्रतिभा सावंत ज्योती सावंत दिशा कांबळे विशाखा कांबळे यांनी मेहनत घेतली. सहभागी महिलांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





