भाजपा महिला आघाडी च्या वतीने कणकवलीत रक्षाबंधन

रक्षाबंधन निमित्ताने कणकवली तील रिक्षा चालक,उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर,सफाई कर्मचारी,एसटी कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन भाजपा जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण व महिला पदाधिकाऱयांनी सर्व पोलीस बांधवाना राख्या बांधल्या. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती वनाथी आक्का श्रीनिवासन,भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ चित्रा वाघ व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांच्या अध्यक्षतेखाली रक्षाबंधनचा स्नेह यात्रा हा कार्यक्रम कणकवली येथे पार पडला.यावेळी भाजपा महिला तालुकाध्यक्ष सौ वनिता बुचडे, माजी तालुकाध्यक्ष गीता कामत,भाजपा महिला तालुका उपाध्यक्षा सौ संजना सदडेकर,कलमठ ग्रामपंचायत सदस्या सौ स्वाती नारकर,कार्यकारणी सदस्य सौ सायली कावले उपस्थित होत्या.
कणकवली प्रतिनिधी





