“त्या” युवतीच्या पोस्ट प्रकरणी चौकशी करून कारवाई करा!

कणकवली तालुका मुस्लिम संघटनेच्या वतीने कणकवली पोलीस निरीक्षकांना निवेदन
तालुक्यातील एका गावातील युवतीने पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याविषयी टाकलेल्या पोस्ट बद्दल कणकवली तालुक्यातील मुस्लिम बांधव जाहिर निषेध करतो. ती युवती मुळची कणकवली तालुक्यातील नसून बाहेरील राज्यातून आलेल्या एका युवतीने आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर दिनांक १४/०८/२०२३ रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करणेबाबतचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवला. तसेच हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तो मिडीयामध्ये प्रसिध्द केला. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी तालुका मुस्लिम संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आजतगायत कणकवली तालुक्यातील स्थानिक मुस्लिम व स्थानिक इतर धर्मियांबाबात कधीही आपसात मतभेद नाहीत. सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. फक्त कणकवली तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वधर्म समभावात चालतो याचे राज्यात आदर्श उदाहरण आहे.
अशी परिस्थिती असताना एखादी विशिष्ट व्यक्ती गैरकृत्य करीत
असेल तर त्या व्यक्तीबाबत सखोल चौकशी होवून त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
भारतीय राज्य घटनेने सर्व धर्मियांना समान अधिकार दिलेला आहे. त्याचे पालन करुन सर्व धर्मियांचा आदरभाव करणे हे कायद्याने आवश्यक हा प्रकार खरोखरच लांच्छनास्पद व समाज विघातक
आहे. सदरचा झालेला प्रकार विघातक कृत्य आहे. त्याचा आम्ही कणकवली तालुक्यातील मुस्लिम धर्मियः
जाहिर निषेध करतो व त्या दोषीवर कायदेशीर कारवाई होण्याकरीता
सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी तालुका मुस्लिम संघटनेचे आसिफ नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, निसार शेख, अजीम कुडाळकर, हनिप पीरखान, अनिस नाईक, यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सदर प्रकरणी त्या युवतीची चौकशी सुरू असून योग्य चौकशी आंती संबंधितांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
दिगंबर वालावलकर/ कणकवली