पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन, हिंदू देवतांविषयी बदनामीकारक मजकूर कणकवली भाजपाची पोलीस स्टेशन वर धडक!

आमदार नितेश राणे यांनी संबंधितांचा शोध घेत कारवाईची केली मागणी

“तुमचे खूप लाड झाले” या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या वक्तव्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करणे त्याचबरोबर हिंदू देवतांविषयी बदनामीकारक मजकूर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करत तालुक्यातील एका गावातील एका युवतीने केलेल्या या प्रकाराने भाजपा आक्रमक झाली असून, या प्रकरणी कणकवली पोलीस स्टेशन मध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी धाव घेतली. माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्यासह पदाधिकारी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये थांबलेले असताना एका महिला पोलीस अधिकाऱ्याने “तुमचे खूप लाड झाले” बाहेर थांबा असे वक्तव्य केल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर काही वेळातच आमदार नितेश राणे हे देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना बोलवा त्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. असं सांगत आमदार नितेश राणे यांनी त्या संबंधित महिला अधिकाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. तसेच पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबत त्या युवतीने टाकलेल्या पोस्टच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करा. अशी मागणी श्री राणे यांनी केली. तसेच जिल्ह्या बाहेरून येऊन राहणाऱ्या व अशाप्रकारे जिल्ह्यात वातावरण बिघडवून पाहणाऱ्या लोकांचा शोध घ्या अशी देखील मागणी आमदार राणे यांनी केली.कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान त्या युवतीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असल्याचेही समजते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!