*_असाक्षरांनीही मारली बाजी_* *सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असाक्षरांच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के* सिंधुदुर्गनगरी, दि.11 (प्रतिनिधि): केंद्रपुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन 2022-27 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दि.17 मार्च, 2024 रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी  (FLNAT) परीक्षेला…

“त्या” मतदारांना मतदानाचा अधिकार प्रशासनाने मिळवून द्यावा!

भाजपाच्या शिष्टमंडळाची कणकवली प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या भाड्याच्या गाड्यांवरील ड्रायव्हर आपल्या इलेक्शन ड्युटीवर असल्याने त्यांची पर्यायी व्यवस्था मतदानासाठी झाली नाही. असे अनेक जन मतदानापासून वंचित राहिले आहेत. एकीकडे शासन निवडणूक विभागाच्या वतीने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या  तीन  विद्यार्थ्यांची “टाटा वोल्टास प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीमध्ये निवड. जयसिंगपूर:  शिक्षण क्ष्रेत्रात आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात असलेल्या  संजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील मेकॅनिकल इंजिनीरिंगच्या ३ विद्यार्थ्याची टाटा वोल्टास प्रायव्हेट लिमिटेड  कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विध्यार्थ्यांना…

रेडियम कटरने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

संशयीताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद शहरातील सिद्धार्थनगर येथील गौतम हिंदळेकर याच्यावर पुर्ववैमनश्यातून कटरने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शहरातील माऊलीनगर येथील महेंद्र गोपाळ चव्हाण याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी…

पालघर लोकसभा मतदार संघाचे सहनिरीक्षक म्हणून आमदार नितेश राणे यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती कणकवली,देवगड, वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदार संघाचे भाजप पक्षाचे सह निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण…

अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन म्हणजे लोकशाहीचा विजय

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी मानले आभार कणकवली – आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन म्हणजे लोकशाहीचा विजय…

निवृत्तीवेतन धारकांच्या वारसांना दिलासा देणारी अधिसूचना जारी दि.८ फेब्रुवारी २०२४ च्या अधिसूचनेचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने केले स्वागत. वैभववाडी(प्रतिनिधि) शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याला निवृत्तीवेतन मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे. परंतु निवृतीवेतन धारक कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला पेन्शन…

देवी भगवती माहेरस्वारी सोहळा १० मे रोजी  

मसुरे प्रतिनिधी देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवीचा माहेरस्वारी सोहळा १० मे रोजी होणार आहे. देवी भगवती  मुणगे गावातील कारीवणेवाडी येथे पाडावे कुटुंबीयांच्या घरी दर तीन वर्षांनी माहेरपणासाठी जाते. यानिमित्त कारीवणेवाडी येथे  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

तारकर्ली रस्त्यावर रस्ता खोदल्यामुळे गाड्यांचे अपघात      मालवण(प्रतिनिधी)मालवण तालुक्यातील पर्यटन गाव जगाच्या नकाशावर असताना सुस्थितीत असलेला तारकर्ली रस्ता दोन्हीं बाजूंनी जल जीवन मिशन खात्याने खोदलेला आहे तो त्वरित जसा होता त्याच स्थितीत येत्या पंधरा दिवसात पूर्ण करावा अशी मागणी तारकर्ली चे…

*_जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक_*

*मान्सून कालावधीत पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज*

-जिल्हाधिकारी किशोर तावडे


            सिंधुदुर्ग दि ०९ (जिमाका) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज असणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून ठेवावा, गावात कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास त्याची त्वरित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास (०२३६२)२२८८४७ /१०७७ या क्रमांकावर देण्याच्या सूचना आपल्या प्रत्येक गावातील ग्रामसेवकांना देण्यात याव्यात,तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून सर्व विभागांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे,  आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्यांवर झाड पडल्यास ते झाड त्वरित बाजूला करण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. तसेच अशा रस्त्यांवरची धोकादायक झाडे/ फांद्या मान्सून कालावधीपूर्वी बाजूला करण्यात याव्यात, मान्सूनपूर्व कालावधीत  महामार्गाच्या दुतर्फा साईड पट्टी ,मातीचा भराव टाकावा, राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक व अपघातप्रवण जागांची निवड व या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाईची कामे त्वरित हाती घेण्यात यावीत व पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण करावीत, नगरपालिका अखत्यारीतील रस्त्यांची डागडुजी करून घेण्यात यावी, पावसाळा कालावधीत नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होईल याबाबत दक्षता घेण्यात यावीत, मान्सून कालावधीत नगरपालिका क्षेत्र स्वच्छ राहील याची दक्षता घेण्यात यावी, अस्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरणार  नाहीत याची काळजी घ्यावी, पावसाळा कालावधीतील साथीच्या आजाराचे नियंत्रण करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, पंचायत समिती अंतर्गत विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची बैठक घेवून आपत्कालीन परिस्थिती तालुक्यास उद्भवल्यास करावयाच्या नियोजनाबाबत विचारविनिमय करावा असेही ते म्हणाले.

          मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देशमुख म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे, पावसाळ्या दरम्यान उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबत जनजागृती करावी, मृत जनावरांची विल्हेवाट लावावी, सूक्ष्म नियोजन करुन परिस्थिती हाताळावी असेही ते म्हणाले.

          बैठकीच्या सुरूवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुकटे यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प माहिती, मान्सून कालावधीतील मुख्य धोके, पूर येण्याची कारणे, दरड कोसळण्याची कारणे, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शोध व बचाव करिता घेण्यात आलेल्या साहित्याची सद्यस्थिती आदींची माहिती दिली.

००० ०००

error: Content is protected !!