नील बांदेकरचे दुहेरी यश

लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त मुंबई केंद्र आयोजित वक्तृत्व स्पर्धेत बांदा केंद्र शाळा येथील इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. त्याचबरोबर त्याच दिवशी पार पडलेल्या
कैलासवासी विद्यालय शिरसाठ स्मृती आयोजित कथाकथन स्पर्धेत त्यांनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. नील याला केंद्रशाळेतील समस्त शिक्षकवृंद, आई-वडील यांचे योग्य असे मार्गदर्शन लाभले.
नीलने आतापर्यंत विविध स्पर्धांत भाग घेऊन १५० पेक्षा जास्त बक्षिसे पटकावली आहेत. नुकताच त्याचा आमदार वैभवजी नाईक यांच्या शुभहस्ते अष्टपैलू विद्यार्थी म्हणून ओरोस येथे सत्कार करण्यात आला . नीलवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बांदा सावंतवाडी / प्रतिनिधी

error: Content is protected !!